व्यवसायचारा-पाणी टंचाईचा पशुपालकांना मोठा फटका; गाई-म्हशींचे दर घसरले!
दुष्काळी परिस्थिती आणि चारा-पाण्याच्या वाढत्या टंचाईमुळे पशुपालक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता. माढा) येथील जनावरांच्या आठवडा बाजारात गाई-म्हशींच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, जनावरे विकूनही शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे.
