कापसाला एमएसपीपेक्षा जास्त दर; यंदा शेतकऱ्यांना किती भाव मिळणार पहा
यंदाच्या कापूस हंगामाच्या सुरुवातीलाच उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत मिळू लागले देखिल खुल्या बाजारात कापसाचे दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) अधिक असल्याचे चित्र सध्या समोर आले आहे.
- लेखक / प्रतिनिधी
- जय किसान डेस्क
- प्रकाशित तारीख
- २३ ऑक्टोबर, २०२६
- प्रकाशित वेळ
- दुपारी १२:०६
- शेवटचे अपडेट
- २३ ऑक्टोबर, २०२६, दुपारी १२:१८

नागपूर जिल्ह्यातील कुही कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचा भाव प्रतिक्विंटल ९,५०० रुपयांपर्यंत पोहोचला, तर मध्य प्रदेशातील सौसर परिसरातील बेरडी येथे हंगामाच्या पहिल्या खरेदीच्या मुहूर्तावर कापसाला ९,१०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे यंदा कापसाला चांगला भाव मिळेल, अशी आशा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालीली आहे.(Cotton Market)
कुहीत कापसाचा भाव ९,५०० रुपयांवर
कुही कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या खरेदीला सुरुवात झाली असून, बाजारात प्रतिक्विंटल ९,५०० रुपयांपर्यंत दर नोंदविण्यात आल तसेच बुधवारी हैदराबाद परिसरातून कापसाच्या चार गाड्या बाजारात दाखल झाल्या. प्रत्येक गाडीत सुमारे ९० क्विंटल कापूस असल्याने एकूण आवक जवळपास ३६० क्विंटल झाली आहे.
हंगामाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या दरामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे तसेच यंदा उत्पादन खर्च, पिकाची स्थिती आणि बाजारातील मागणी लक्षात घेता चांगल्या भावाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे,,. मात्र, हा दर संबंधित कापसाच्या गुणवत्तेनुसार मिळालेला असून, सर्व शेतकऱ्यांना सरसकट हाच भाव मिळेल असे देखिल नाही.
बेरडी येथे मुहूर्ताच्या खरेदीत ९,१०१ रुपये
मध्य प्रदेशातील सौसर परिसरात कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.तसेच या भागात व्यापाऱ्यांनी नवीन हंगामातील कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. बेरडी रोडवरील कैलास जिनिंग इंडस्ट्रीज येथे कापूस खरेदीचा पहिला मुहूर्त पार पडला. यावेळी कापसाला प्रतिक्विंटल ९,१०१ रुपये दर देण्यात आला आहे.....
हंगामाच्या सुरुवातीलाच मिळालेला हा दर कापूस उत्पादकांसाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे. मात्र, आगामी काळात बाजारातील आवक, कापसाची गुणवत्ता आणि जिनिंग उद्योगाची मागणी यानुसार दरात चढउतार होऊ शकतात.
मध्यम धाग्याला ८,२६७, लांब धाग्याला ८,६६७ रुपये हमीभाव
केंद्र सरकारने २०२६-२७ हंगामासाठी कापसाच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार मध्यम धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ८,२६७ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसासाठी ८,६६७ रुपये एमएसपी निश्चित करण्यात आला आहे,,
कुही येथे नोंदविलेला ९,५०० रुपयांचा दर मध्यम धाग्याच्या कापसाच्या एमएसपीपेक्षा १,२३३ रुपयांनी अधिक आहे तसेच तर बेरडी येथील ९,१०१ रुपयांचा दर मध्यम धाग्याच्या एमएसपीपेक्षा ८३४ रुपयांनी जास्त आहे. त्यामुळे संबंधित दर्जाच्या कापसासाठी खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता दिसत आहे.
कापसाच्या गुणवत्तेनुसार ठरणार दर
(Cotton Market) पसाचे बाजारभाव ठरविताना धाग्याची लांबी, कापसाची गुणवत्ता, ओलाव्याचे प्रमाण आणि इतर निकष महत्त्वाचे ठरतात तसेच मुळे बाजारात जाहीर झालेला सर्वोच्च दर आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळणारा दर यामध्ये फरक असू शकतो.
बाजारातील आवक वाढल्यास किंवा जिनिंग उद्योगांकडून खरेदी कमी झाल्यास दरावर दबाव येऊ शकतो तसेच उलट, कापसाला मागणी कायम राहिली आणि दर्जेदार कापसाची उपलब्धता मर्यादित राहिली, तर दराला आधार मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील दरवाढीकडे
हंगामाच्या सुरुवातीला कापसाला एमएसपीपेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, सुरुवातीच्या काही व्यवहारांवरून संपूर्ण हंगामातील दरांचा अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही अणि ढील काळात (Cotton Market)कापसाची आवक, बाजारातील मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी यांचा भावावर परिणाम होऊ शकतो.
शेतकऱ्यांनी कापूस विक्री करताना आपल्या मालाची गुणवत्ता, स्थानिक बाजार समितीतील प्रत्यक्ष दर आणि व्यापाऱ्यांकडून मिळणारा भाव यांची तुलना करावी. हंगामाच्या सुरुवातीला मिळालेली दरवाढ(Cotton Market) टिकून राहणार की आवक वाढल्यानंतर भावात बदल होणार, याकडे आता कापूस उत्पादकांचे लक्ष देखिल लागले आहे.



