यशोगाथामुलाच्या आजारपणाने बदलले आयुष्य! संगीता बद्रे यांनी सेंद्रिय शेतीतून उभी केली नवी ओळख; २५ महिलांना रोजगाराची संधी
*अमरावती :** मुलाच्या आजारपणातून मिळालेल्या अनुभवाने एका आईच्या आयुष्याला नवी दिशा दिली. कुटुंबाला सुरक्षित आणि विषमुक्त अन्न मिळावे, या विचारातून सुरू झालेला प्रवास आज सेंद्रिय शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि महिला सक्षमीकरणापर्यंत पोहोचला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरजगाव कोरडे येथील संगीता राजू बद्रे यांनी आपल्या जिद्दीतून शेतीसोबतच ग्रामीण महिलांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.

